नांदेडात राजू यादव यांचा सत्कार: केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या सल्लागार मंडळावर नियुक्ती

नांदेड दि.१८ नोव्हेंबर, (विशेष प्रतिनिधी) ———- भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या वतीने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ, मुंबईच्या सल्लागार मंडळावर नांदेडचे सामाजिक कार्यकर्ते राजू यादव यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रतिष्ठेच्या नियुक्ती मुळे नांदेडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, यादव समाजात आणि शहरात आनंदाचे वातावरण आहे.या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी यदुकुल यादव मंडळ, वजीराबाद येथे यादव महासभा, यादव युवक संघ आणि मित्र परिवाराच्या वतीने राजू यादव यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत पुष्पहार, शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.या सत्कार सोहळ्याला यादव महासभेचे राष्ट्रीय सचिव बिशणकुमार यादव, राधाकिशनजी यादव, डॉ. कैलाश यादव, प्रभूलाल बटावाले, भारत भूषण यादव, गोपाल फतेलष्करी, ईश्वर बटावाले, राहुल ठाकुर, संजय फुलारी, सतीश यादव, राजेश कुलकर्णी, गोकुळ यादव, शिवा काळे, स्वराज यादव, अजय यादव, सुंदरलाल बटावाले, पवन बोरा, राजेश बटावाले आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना उपस्थितांनी खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी या नियुक्तीच्या प्रक्रियेत दिलेल्या सहकार्याबद्दल विशेष आभार मानले. एका सामान्य सामाजिक कार्यकर्त्याला राष्ट्रीय स्तरावर ही जबाबदारी मिळणे नांदेडसाठी अभिमानास्पद असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. चित्रपट क्षेत्राच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न, संस्कृती आणि मूल्ये प्रभावीपणे मांडण्यासाठी ही भूमिका महत्त्वाची ठरेल, असा विश्वास व्यक्त करत मान्यवरांनी राजू यादव यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top