या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, मिरवणुकीतील सुरक्षेचा आणि हुल्लडबाजांवर पोलिसांच्या नियंत्रणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून, दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

दि.२३ हिंगोली: (जिल्हाप्रतिनिधी) ——————- कावड यात्रेच्या मिरवणुकीदरम्यान दोन डीजे वाहनांच्या भीषण धडकेत सोमनाथ भानावत (वय १९) या शिवभक्त तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना हिंगोलीत घडली आहे. नशेत धिंगाणा घालणाऱ्या काही तरुणांच्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, घटनेचा थरार उपस्थितांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कावड यात्रेनिमित्त हिंगोलीत मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत सोमनाथ भानावत हा तरुणही शिवभक्त म्हणून सहभागी झाला होता. मिरवणूक सुरू असतानाच अंमली पदार्थांचे सेवन केलेल्या काही हुल्लडबाज तरुणांमध्ये आपसात जोरदार वाद झाला. या वादातून संतापलेल्या चालकांनी डीजेची दोन वाहने भरधाव वेगात मागे (रिव्हर्स) घेऊन एकमेकांना जोरदार धडक दिली. दुर्दैवाने, सोमनाथ हा याच दोन डीजे वाहनांच्या मध्ये उभा होता. वाहनांची धडक इतकी भीषण होती की, दोन्ही वाहनांमध्ये चिरडल्या गेल्याने सोमनाथ गंभीर जखमी झाला. उपस्थितांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, मिरवणुकीतील सुरक्षेचा आणि हुल्लडबाजांवर पोलिसांच्या नियंत्रणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून, दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
https://www.instagram.com/reel/DcYpOJNsnOR/?igsi=MTBoZWozaWlpOGpjYQ==