नांदेडसह हिंगोली, परभणीत भूकंपाचे धक्के; सेवालाल चौक, नमस्कार चौक,आनंदनगर,लातूर फाटा भागात हादरे जाणवले

दि.३ ऑक्टोबर नांदेड : (जिल्हा प्रतिनिधी) – – – आज शनिवारी सकाळी ९ वाजून ४३ मिनिटांनी नांदेड शहरासह हिंगोली आणि परभणी परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. सेवालाल चौक, नमस्कार चौक, आनंदनगर तसेच लातूर फाटा या भागांतील नागरिकांनी भूकंपाचा धक्का स्पष्टपणे जाणवल्याची माहिती दिली आहे. घराबाहेर पडलेल्या नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण होते, मात्र प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.भूकंपाचे केंद्रस्थान हिंगोली जिल्ह्यात असून, ते नांदेड शहरापासून सुमारे ६५ ते ७५ किलोमीटर उत्तरेस/वायव्येस आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.५ इतकी नोंदवली गेली असून, काही स्थानिक प्राथमिक नोंदींनुसार ती ३.३ ते ४.५ दरम्यान आहे. भूकंपाची खोली जमिनीखाली केवळ ५ किलोमीटर इतकी अत्यंत कमी असल्याने नांदेडसह हिंगोली आणि परभणी भागांत धक्के तीव्रतेने जाणवले. अकोल्यापासून हे केंद्रस्थान सुमारे १२९ किलोमीटर दक्षिणेस आहे. या भूकंपामुळे सध्या तरी कोणत्याही प्रकारच्या मोठ्या जीवित किंवा वित्तहानीचे वृत्त नाही. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवून अधिकृत माहिती घेतली जात असून, नागरिकांनी कोणतीही अफवा पसरवू नये तसेच सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top