
नांदेड, दि. ५ ऑक्टोबर (जिल्हा प्रतिनिधी) – – – सुप्रसिद्ध नाट्यलेखक, रंगकर्मी आणि आंबेडकरी चळवळीतील विचारवंत डॉ. विलासराज भद्रे (५६) यांचे आज पहाटे ४.४५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक, सांस्कृतिक व वैचारिक क्षेत्रातील एक हळवी घट झाली आहे. डॉ. भद्रे यांनी वैद्यकीय क्षेत्रासोबतच अभिनय व दिग्दर्शन क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले. आंबेडकरी विचारांच्या लेखनातून त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या पार्थिवावर आज (दि. ५ ऑक्टोबर) दुपारी ३ वाजता उमरी (रेल्वे स्टेशन) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, एक भाऊ माजी नगरसेवक अरुण भद्रे, पत्नी डॉ. वंदना भद्रे, एक मुलगी आणि दोन बहिणी असा परिवार आहे.